लोहारा सेंट्रल बँकेची इंटरनेट सेवा ५ दिवसांपासून खंडित ; ऐन दिवाळीच्या तोंडावर ग्राहक हैराण

277

 

लोहारा दिनेश चौधरी – लोहारा ता.पाचोरा येथील एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बँकेची इंटरनेट सेवा गेल्या ६ नोव्हेंबर पासून लगातर आजपावेतोही खंडित असल्याने नसगरिकांची व व्यापारी बांधवांची खूपच फजिती होत आहे.विशेष म्हणजे ऐन दिवाळीचा सण जवळ आल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पैशाची आवश्यकता असल्याने ग्राहक दररोज बँकेत 2 ते 3 चकरा मारतोय. इंटरनेट सेवा सुरू नसल्याने रिकाम्या हाती परत जात आहेत.
लोहारा सेंट्रल बँकेत लोहारा, म्हसास, कळमसरा,शहापूरा, रामेश्वर, कासमपुरा गावातील नागरिकांचे जवळपास २० हजार बँकखाते आहेत. त्यामुळे बँकेत नेहमीच व्यापारी, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, नागरिक यांचे व्यवहार असतात.त्यात सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या ४दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्यामुळे खरेदी साठी लगबग सुरू आहे. मात्र बँकेत पैसे असल्याने ते काढण्यासाठी ,व्यापारी वर्गांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेत इंटरनेट सेवा बंद असल्याने सर्व नियोजन बिघडले आहे.
तसेच पैसे काढण्याची पर्यायी व्यवस्था असलेले सेंट्रल बँकेच्या एटीएम मध्ये ही पैसे नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.लोहारा एटीएम हे गेल्या कित्येक दिवसापासून शो पीस ठरत आहे.
लोहारा येथे एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने सर्व व्यवहार याच बँकेत आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी येथील सेंट्रल बँकेत काही तांत्रिक बिघाड झाल्यास अशा प्रकारे ४ते ५ दिवस दुरुस्ती करण्यासाठी लावावे,हे आश्चर्यच वाटते?अशा संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त होत आहेत.
याबाबत सेंट्रल बँकेचे शाखा प्रबंधक कॅप्टन विकेशकुमार यांचेशी संपर्क साधला असता बीएसएनएल व एअरटेल इंटरनेट ची व्यवस्था असलेले केबल मॉडेममध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. ते दुरूस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयातुन येतील असे सांगण्यात आले.
तरी संबंधित अधिकारी यांनी त्वरित लक्ष देऊन लोहारा व परिसरातील नागरिकांना सेवा द्यावी अशी मागणी होत आहे.