पाचोरा : विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ. सागर गरुड यांनी घेतली एकनाथ खडसे यांची भेट

442

शेंदुर्णी तालुका जामनेर प्रतिनिधी – पाचोर्‍यातील विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ. डॉक्टर सागर गरुड यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली याबाबत सविस्तर वृत्त असे की ,जळगाव जिल्ह्यातील वजनदार नेते नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे ची डॉक्टर सागर गरुड यांनी भेट घेतली ,यावेळी त्यांचे सोबत तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते संजय दादा गरुड उपस्थित होते . डॉक्टर सागर गरुड हे आपल्या रुग्णालयाच्या माध्यमातून शासनाच्या महात्मा फुले योजने अंतर्गत व इतर योजनांमधून रुग्णांचे मोफत शस्त्रक्रिया तसेच मोफत सिजेरियन व डिलेवरी करीत आहे  त्याचा फायदा पाचोरा जामनेर भडगाव सोयगाव व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील रुग्णांना होत आहे ,या बाबत नाथा भाऊंनी माहिती जाणून घेतली ,सागर गरुड व त्यांच्या डॉ. टीम ने कोरणा काळात रुग्ण सेवा केल्याने त्यांचे विशेष कौतुक नाथा भाऊंनी यावेळी केले , तीन तालुक्यात डॉ. डॉक्टर सागर गरुड यांच्या वतीने मोफत अन्नधान्य वितरण झाल्याचे समजल्यावर त्यांनी त्यांना विशेष शाबासकी दिली . विघ्नहर्ता हॉस्पिटल ची नवी शाखा कजगाव व शेंदुर्णी येथे रुग्ण सेवेसाठी उपलब्ध झालेली आहे, त्याचे लवकरच शुभारंभ होणार असून त्याकरता नाथा भाऊंनी शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.