जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प व इतर प्रकल्पां संदर्भात व लोकनेता स्वर्गीय गोपीनाथारावजी मुंडे यांचे स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्वादी नेते एकनाथ खडसे यांनी घेतली भेट

221

प्रतिनिधी मुंबई – मा.श्री.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प व इतर प्रकल्पां संदर्भात आज लोकनेते तथा मा.महसूल-कृषीमंत्री एकनाथरावजी खडसे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी नाथाभाऊ मंत्री असतांना, दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपिनाथरावजी मुंडे साहेबांच्या स्मारकाकरीता औरंगाबाद येथे जमिन उप्लब्ध करुन दिलेली होती तसेच त्या स्मारकाकरीता साधारण 25 कोटि रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिलेली होती, नंतर नाथाभाऊंचे मंत्रीपद गेल्यावर दुर्दैवाने या स्मारकाकरीता निधी उप्लब्ध झाला नाही व प्रस्तावित स्मारकाची साधी वीट देखील रचण्यात आली नाही. येणाऱ्या 12 डीसेंबर रोजी असलेल्या मुंडे साहेबांच्या जयंतीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांना सदरील स्मारकाकरीता निधी उप्लब्ध करुन द्यावा अशी मागणी केली त्यावर मा.उध्दवजी ठाकरे साहेबांनी सकारत्मकता दर्शवली व येत्या काळात औरंगाबाद दौरा असल्यास स्वत: प्रस्तावित स्मारकाच्या ठीकाणी भेट देऊन पहाणी करेल असे आश्वासन दिले. तसेच जळगाव जिल्ह्यातील शेळगाव बैरेज व बोदवड उपसा सिंचन योजनेकरीता केंद्रीय जल आयोगामार्फत मान्यता मिळाली असुन सदरील प्रकल्पांकरीता केंद्रामार्फत निधी देण्यात येणार आहे, परंतु त्याकरीता राज्यसरकार मार्फत केंद्र सरकार ला प्रस्ताव देण गरजेचे आहे. म्हणुन कैबिनेट च्या बैठकीत सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मांडुन केंद्राकडे पाठवावा अशी मागणी नाथाभाऊंनी केली. यावर मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांनी सदरील योजनेकरीता राज्यसरकार तात्काळ प्रस्ताव तयार करुन लवकरच केंद्र सरकारकडे पाठवेल असे आश्वासित केले.