शिक्षक समिती कडून तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन सादर

186

 

खुलताबाद प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा खुलताबादच्या वतीने खुलताबाद तालूक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक २०२० संदर्भान्वये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सुरेद्र देशमुख साहेब,यांना निवेदन देऊन त्याच्याशी चर्चा करुन काही प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागील झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत कर्तव्य बजावलेल्या शिक्षक बंधू भगिनींचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे,BLO चे थकीत मानधन तात्काळ अदा करावे,दुर्धर आजार असलेले,५० वर्ष पेक्षा अधिक वयाचे कर्मचारी,महिला कर्मचारी तसेच गरोदर,स्तनदा माता यांना निवडणूक कर्तव्यातून सूट देण्यात यावी.कोविड १९ पासून बचाव व्हावा यासाठी मतदान अधिकारी यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्या,महिलांना सक्तीने केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी १ ची ड्युटी न देता कार्यरत मुख्यालयाजवळ नियूक्ती देण्यात यावी,महिला मतदान अधिकारी यांना मतदान संपल्यानंतर तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.बी.एल.ओ. साठी नियूक्त कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासक साठी नियुक्त कर्मचारी यांना निवडणूकीसंदर्भात इतर कामातून वगळण्यात यावे.मतदान अधिकारी यांना स्वत:च्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल मतपत्रिका किंवा पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.निवडणूक कर्तव्य भत्ता मतदान संपल्यानंतर तात्काळ वितरीत करण्यात यावा.निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना सुटी जाहीर करण्यात यावी.
आदी विषयावर तहसीलदार साहेबांशी सकारात्मक चर्चा होऊन माननीय निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुरेद्र देशमुख साहेब यांनी सर्व मुद्दे समजावून घेऊन महिला कर्मचारी यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यांना शक्यतो जवळच मुख्यालयाजवळच देण्यात येईल तसेच कुणाही शिक्षक कर्मचाऱ्यांना सुद्धा त्रास न होता आपण सगळेजण निवडणूक चागल्या प्रकारची पार पाडू असे आश्वासन दिले थकीत मानधन प्राप्त करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा चालू असून मानधन प्राप्त होताच तात्काळ तुमच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगितले
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष के.के.जंगले, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,खुलताबाद तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ खाडे,सरचिटणीस विलास साळुंखे,तालुका नेते संजय शेळके,कोषाध्यक्ष मच्छिंद्र निमोणे,कार्याध्यक्ष वासुदेव कोळी,संपर्क प्रमुख अतूल गायके,वासुदेव चौधरी,विजय भंडारी,राऊत सर,महिला आघाडी प्रमुख वैशाली हिवर्डे,शिक्षक सेनेचे गणेश पिंपळे सह शिक्षक समितीचे सदस्य उपस्थित होते.