अजित गोपछडे यांचे संघटन कौतुकास्पद माजी मंत्री गिरीश महाजन यांचे गौरव उदगार

189

मुंबई: भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी चे महाराष्ट्रातील संघटन हे दिवसेंदिवस वाढत असून,दररोज नवीन नवीन वैद्यकीय क्षेत्रातील तमाम मंडळी भाजपकडे आकर्षित होत आहेत,यासाठी डॉ. अजित गोपछडे यांची मेहनत आणि संघटन कौशल्य कारणीभूत असून नक्कीच त्यासाठी ते कौतुकास पात्र आहेत.

भारतीय जनता पार्टी वैद्यकीय प्रकोष्ठ पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर रामभाऊ म्हाळगी मुंबई येते आयोजित केले असून ,सदर शिबिराचे उदघाटन माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रभारी आ. गिरीश महाजन यांनी केले. पुढे ते म्हणाले की करोना महामारी मध्ये वैद्यकीय आघाडीने अतिशय जनहितार्थ कार्य केले असून महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यायला हवी.मुख्यमंत्री सहायता निधी हा भाजप शासनात परिपुर्ण पणे खर्च झाला असून सध्याचे शासन मात्र त्याबद्दल अनभिज्ञ आहे,हीच खरी शोकांतिका आहे. डॉ. गोपछडे यांचे कार्य अविरत चालणारे असून नक्कीच आगामी काळात पक्ष याबद्दल दखल घेईल याबाबात वैद्यकीय आघाडी ने निश्चित राहावे.

यावेळी दिवसभरात वैद्यकीय आघाडीला,खालील विषय आणि त्यावरील वक्ते यांचे विशेष प्रशिक्षण झाले. जनसंघ ते भाजप,माधव भंडारी,राजकीय व्यक्तिमत्व व संवाद कौशल्य, श्रीकांत भारतीय, समरसतेचा आदर्श बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ. रमेश पांडव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विचार परिवार रवींद्र साठे, शेवटी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची ऑन लाईन चर्चा सत्र झाले आणि रात्री भाजप मुख्य प्रवत्ता केशव उपाध्ये याचे मुक्तचिंतन झाले.

यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक वैद्यकीय शाखेचे डॉक्टर, मेडिकल,पॅरा मेडिकल, रेडिओ ग्राफर, लॅब विशेष तज्ञ आणि शिवाय नव्याने नर्सिंग शाखा सुरू झाली असून सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दीपप्रज्वलन करतांना वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री आ. गिरीश महाजन, मुख्य संयोजक डॉ अजित गोपछडे,मीरा भाईंदर महापौर ज्योत्स्ना हसनाळे, डॉ बाळासाहेब हरपाळे, डॉ प्रशांत पाटील,डॉ अनुप मरार,डॉ विंकी रुघवानी,डॉ स्वप्नील मंत्री,डॉ राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.