खुलताबाद तालुक्यातील 39 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहिर

309

 

25 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा मार्ग मोकळा

खुलताबाद प्रतिनिधी /
तालूक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असुन खुलताबाद तालूक्यातील 25 ग्रामपंचायतीचे सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे,
तालुक्यातील निवडणूक झालेल्या 25 ग्रामपंचायती पैकी बऱ्याच ठिकाणी महिलांना सरपंच होण्याची संधी मिळाली असल्याने महिला वर्गाचा उत्साह वाढला आहे.

शुक्रवार रोजी खुलताबाद तालूक्यातील 39 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण शहरातील म्हैसमाळ रोड असलेल्या
डॉक्टर जाकिर हुसैन शिक्षण महाविद्यालय यांच्या मल्टीपर्पज सभागृहात  सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच पदाच्या आरक्षण पदाची सोडतीला सुरवात करण्यात आली यामध्ये तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या व 39 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले

यामध्ये खुलताबाद तालूक्यातील
कानडगाव महमदपुर ग्रुप ग्रामपंचायत व पळसवाडी ग्रामपंचायत अनुसूचित जाती
रसूलपुरा,पिंप्री अनुसूचित जाती महिला,
खांडी पिंपळगाव जाफरवाडी ग्रुप ग्रामपंचायत अनुसूचित जमाती
पाडळी सोबलगाव ग्रुप ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिला,

लोणी, म्हैसमाळ, देवळाणा, झरी, येसगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग

वडोद बुद्रुक, कागजीपुरा, कसाबखेडा, निरगुडी, सोनखेडा, सराई नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला

वेरूळ, धामणगाव, चिंचोली, घोडेगाव, तिसगाव तांडा, ताजनापूर सुलीभंजन, मावसाळा, तिसगाव, गोळेगाव, टाकळी राजेराय खुल्या प्रवर्गातील महिला

बोडखा, कनकशीळ, पळसगाव, दरेगाव, विरमगाव, बाजार सावंगी, गल्ले बोरगाव, भडजी, खिर्डी, सुलतानपूर, गदाना खुला प्रवर्ग

याप्रमाणे आरक्षण जाहीर झाले असुन आरक्षण सोडतीसाठी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार तहसीलदार प्रभाकर गवळी तलाठी डीपी गोरे,विनेश महेर विनोद जाधव भगवान घुसळे, हरिदास पांढरे संजय भुंगे विलास वाहुळ,कारभारी घुसळे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले

खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा गल्लेबोरगाव, बाजारसावंगी, वेरूळ, राजेराय टाकळी, पळसवाडी, वडोद बुद्रुक, मावसाळा , कागजीपूरा, बोडखा, पिंपरी, सराई, भडजी, खांडिपिंपळगाव,नसुलतानपूर, धामणगाव, निरगुडी, म्हैसमाळ, गदाना, सोनखेडा, कनकशिळ, ताजनापूर, खिर्डी, गोळेगाव, झरी या 25 ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा लांबलेला कार्यकम आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे ग्रामपंचायतीचे सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला असून नवीन काढण्यात आलेल्या आरक्षण सोडती मध्ये काही गावात पूर्वी जे आरक्षण निघाले होते तेच राहिल्याने काही ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला तर काही ठिकाणी बदल झाल्याने ग्रामपंचायत सदस्यांचा हिरमोड झाला आहे.