शेंदुर्णी पल्स पोलिओ मोहिमेत 96 टक्के उद्दिष्ट पूर्ण. मान्यवरांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ

233

शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी  – राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीमे करता शेंदुर्णीत सर्व भागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत26 बूथ लावण्यात आले होते .त्यात 74 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मोहिमेचे उद्दिष्ट 96 टक्के झाले, उर्वरित बालकांसाठी पुढील तीन दिवस घरोघरी जाऊन पोलिओचे डोस देण्यात येणार आहे असे वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम यांनी कळविले.
आंबेडकर पुतळा चौकात असलेल्या पोलिओ बुकवर उपजिल्हा प्रमुख शिवसेना मनोहर पाटील ,उपतालुका प्रमुख डॉ सुनील अग्रवाल , जिल्हा आघाडी प्रमुख शारदा पाटील, तालुकाप्रमुख मीना शिंदे ,शिवसेना जिल्हा प्रमुख पुनम बिराडे भुसावळ, शेंदुर्णी शहर प्रमुख संजय सूर्यवंशी व शहर प्रमुख विलास पाटील यांच्या उपस्थितीत विलास पारकर रावेर लोकसभा संपर्कप्रमुख शिवसेना यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला.