प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा येथे बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला

329

 

माणुसकी ग्रुप व आशा सेविका यांनी केली जनजागृती..

लोहारा (दिनेश चौधरी ) पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे काल रविवार दि.३१/०१/२०२१  रोजी लहान मुलांना पोलिओचा डोस पाजून लोहारा परिसरात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ संपन्न झाला. आज संपूर्ण देशात पोलिओ रविवार म्हणून मोहिमेला सुरुवात झाली आहे. देशाला पोलीओ मुक्‍त करण्‍यासाठी या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या मुलांना पोलिओचा डोस द्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी केले.
याप्रसंगी लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र पाटील बोलताना म्हणाले की, पोलिओ हा आजार पूर्णपणे घालवण्यासाठी झिरो ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओचा डोस देणे गरजेचे आहे. त्यासाठी माणुसकी ग्रुप, आशा सेविका यांनी घरोघरी जाऊन पोलिओ लसीकरण विषयी जनजागृती केली.
लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत लोहारा कळमसरा, कासंमपुरा, शहापूरा , म्हसास,रामेश्वर, आंबेवडगाव,जोग कोकडी, कुऱ्हाड, कुऱ्हाड तांडा,लाख,सांगावी, नाईक नगर, सारवे जामने, अशी गावामध्ये लसीकरण संपन्न झाले. व त्यामध्ये ३४८४ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर पाटील, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. प्रदीप खोडके यांच्या मार्गदर्शनाने आरोग्य सहाय्यक डीपी नेटके, शोभा अमोदे ,आरोग्य सेवक परेश धनगर ,आर के राठोड, वसंत काळे ,शिवदास नेटके ,कांतीलाल सोनवणे , सुरेखा गडरी , गजानन क्षीरसागर, देविदास साबळे,कवी मंगलदास मोरे,योगेश वाणी ,आशा सेविका कल्पना चौधरी ,सुनिता चौधरी , संगीता वानखेडे, मनिषा कासार ,साधना ओतारी,मिराबाई धोबी,अश्विनी लोहार ,रूपाली भोलाने ,चंद्रकला शिंपी,व माणुसकी ग्रुप सदस्य यांनी परिश्रम घेतले.