पाचोरा : उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या समोर कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान

434

 

पाचोरा प्रतिनिधी… 
पाचोरा विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अमरावती गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी भारत काकडे यांची नियुक्ती झाली आहे यांचा सत्कार शेख जावीद पत्रकार यानी केला है मावळते पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकड़े हे मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून त्यांच्या पदोन्नतीची चर्चा आहे.
काकडे हे अतिशय शिस्तप्रिय अधिकारी असल्याची त्यांची ख्याति असून त्यांच्यासमोर पाचोरा शहरासह उपविभागातील अवैध ,अवैध, धंदे, व बेशिस्त वाहतूक, वाहतूक कोंडी आदी प्रश्न सोडविण्याचे उद्दिष्ट असणारे आहे.त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यात पाचोरा शहरात झालेल्या साखळी चोरींचा तपास अद्याप सुरु असून अजूनपर्यंत चोरटे सापडले नाहीत असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर असून आगामी काळातील सहकाराच्या निवडणुकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचे उद्धिष्ट असणार आहे त्यामुळे आगामी काळात ते आपल्या कार्याची कशी छाप निर्माण करतात या कडे जनतेचे लक्ष लागून आहे.