पोलिस भरती व अन्य शासकीय विभांगातील रिक्त अनुशेष तात्काळ भरावा – भारतीय बेरोजगार मोर्चा

236

 

प्रतिनिधी जळगाव ..

-भारतीय बेरोजगार मोर्चाचे मुख्यमंत्री यांना निवेदन –
महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासुन पोलिस भरती झालेलीच नाही.मागील सरकारने मेगा भरतीचे गाजर दाखवून परीक्षार्थी बेरोजगार युवकांचा भ्रमनिरास केला. 2019 ला निघालेल्या जाहीरातीनुसार महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये या भरतीचे आवेदन परिक्षा शुल्कासह भरलेले होते.
परंतु त्या जाहीरातीनुसार अद्यापही वर्तमान महाराष्ट्र सरकारने पोलिस भरती केलेली नाही.तद्वतच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त अनुशेष असताना,तो न भरता महाराष्ट्र शासन बेरोजगार युवकांना अधिकच बेरोजगारीच्या खाईत का लोटत आहे ? हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम बेरोजगार विचारत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग,कृषी विभाग,शिक्षण विभाग,गृह विभाग,शासन प्रशासन विभाग,आरोग्य विभाग इत्यादी विभागांमध्ये मागील काही वर्षापासून भरतीप्रक्रियाच राबवलेली नाही.परिणामतः परीक्षार्थींचे वय वाढत चालले आहे.शासनाच्या बेरोजगारांप्रती या उदासीन धोरणामुळे युवकांचे भविष्यात धोक्यात आले आहे. ज्यामुळे लाखो बेरोजगार तणावपूर्ण जिवन जगत आहेत.
भारतीय बेरोजगार मोर्चा, यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडे पुढील मागण्या करीत आहे.
1.महाराष्ट्र शासनाने रखडलेली पोलिस भरती त्वरित करावी.
2.महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात असलेल्या रिक्त अनुशेषानुसार जाहीरात काढुन बेरोजगारांना प्रतिनिधित्व द्यावे.
3.शासनाच्या उदासीन धोरणामुळे ज्या बेरोजगार युवकांनी वयाची अट ओलांडलेली आहे.त्यांना परिक्षांमध्ये तीन वर्षांचे एक्समप्शन म्हणजेच वयाच्या अटीत सवलत देऊन शिथीलता प्रदान करावी.
4.महाराष्ट्र शासनाच्या अख्त्यारितील सर्व विभागातील स्पर्धापरिक्षांची भरती प्रक्रिया ही एमपीएसी द्वारेच राबवण्यात यावी.
5.बेरोजगार युवकांना बेरोजगार भत्ता प्रदान करण्यात यावा.
भारतीय बेरोजगार मोर्चा सदर निवेदनाद्वारे महाराष्ट्र सरकारला कळवू इच्छित आहे की,उपरोक्त भरती प्रक्रिया न राबविता सरकार महाराष्ट्रतील तमाम बेरोजगार युवकांनचे भविष्य अंधकारमय बनवीत आहे.आपल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांच्या ज्वलंत समस्या सोडविण्यात याव्या आणि बेरोजगारांचे भविष्यसुरक्षित करावे ही विनंती.
अन्यथा या संदर्भात महाराष्ट्र सरकारने योग्य ती भुमिका न घेतल्यास भारतीय बेरोजगार मोर्चाद्वारे महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 358 तालुक्यामध्ये परीक्षार्थी बेरोजगार युवकांच्या माध्यमातून कायदेशीर आंदोलन केले जाईल व इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांना मा.तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनावर मा.राहुल भाऊ सपकाळे ( भारतीय बेरोजगार मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष ) मा.रविंद्रभाऊ पवार ( लहुजी संघर्ष सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ) किरण नंन्नवरे, निलेश हीवाळे यांच्या सह्या आहे.