पाचोरा-जळगाव दरम्यान हडसन गावाजवळ अपघात

502

 

पाचोरा प्रतिनिधी – दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान पाचोरा जळगाव राष्ट्रीय महामार्गावर हडसन गावानजीक भरधाव येणाऱ्या वाहनांचा अपघात झाला आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाची नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 ॲम्बुलन्स तसेच मारुती अल्टो कार क्रमांक एम एच 19 ए एक्स 5494 या दोन्ही गाड्या मध्ये अपघात झाला असून यामध्ये अल्टो कार जा डाव्या बाजूचा भाग हा संपूर्णपणे डॅमेज झाला आहे तसेच या अपघातामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून अपघात झालेली अल्टो कार ही डॉक्टर पिंगळे यांची असून त्यामध्ये त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होते. या अपघातात प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ मदतीसाठी पुढे येत पाचोरा येथील रहिइवासी मात्र जळगाव येथील कार्यरत पोलीस कर्मचारी आबा पाटील यांच्या मदतीने शरद मराठे यांनी जखमींना विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे.