संजयदादा गरुड यांच्या वाढदिवसा निमित्त 31 रक्तदात्यांनी केले रक्तदान तर कोरोना योध्यांचा सन्मान

270

 

 शेख हमीद , शेंदुर्णी ता. जामनेर
धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन तथा माजी जि प सदस्य व जामनेर तालुक्यातील महा विकास आघाडीचे नेते संजय गरुड यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर काहींना लस घेतल्यामुळे रक्तदान करता न आल्याची खंत व्यक्त केली. कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला.
जगामध्ये थैमान सुरू असून यामुळे अनेक जण हतबल झालेले आहेत त्यातच रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने माजी जि प सदस्य संजय गरुड यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कार्यकर्त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दिनांक 26 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद 31 दात्यांनी रक्तदान केले. यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालय आणि रेड प्लस ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले.
यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे प्रवक्ता योगेश देसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश जी रामानंद यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तर विघ्नहर्ता हॉस्पीटलचे डॉ सागर गरूड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर आप्पा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, प्रल्हाद बोरसे, दीपक महाराज, सामाजिक न्याय विभागचे संदीप हिवाळे, जामनेर जीन प्रेसचे वाईस चेअरमन पुंडलिक पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष विनोद माळी, माधव चव्हाण, वाकोदचे सरपंच जय पांढरे, शहराध्यक्ष जितेश पाटील, शोएब पटेल, डॉ.बाजीराव पाटील, गोंदेगाव सरपंच देवानंद शिंदे, मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन शेरू काझी स्थानिक नेते सागरमल जैन, सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉ.किरण सूर्यवंशी, स्नेहदीप गरूड,योगेश गुजर, फारुख खाटीक, रवी गुजर, अजय निकम,नंदू बारी, राजू पवार, संदीप सोलंकी, अॅड प्रसंन्न फासे, अॅड. देवेंद्र जाधव, शंतनु गरुड, प्रविण गरूड, गजानन धनगर, गजानन बारी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष काटे, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोरोना योद्ध्यांचा सन्मान
मागील वर्षभरापासून कोरोनाचे थैमान सुरू आहे. हे थैमान रोखण्यासाठी ढाल बनून उभ्या ठाकलेल्या येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना पी पी इ किट आणि सन्मानपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्तदान शिबिराच्या वेळेस कोरोला नियमांचे पालन करून रक्तदान करण्यात आले. तसेच रक्तदात्यांना रक्तदान केल्यानंतर दूध आणि बिस्कीट देण्यात आले. सदर रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी गरुड महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही आर पाटील, विनोद चौधरी, निलेश चौधरी, संजू सपकाळ, प्रा महेश पाटील, प्रा श्याम साळुंखे, मोहन फासे, पंकज जैन, विनोद तडवी, आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा दिनेश पाटील सर यांनी केले. तर गरूड महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने चे विशेष सहकार्य लाभले.

कोरोना नियमांचे पालन करा- संजय दादा गरूड
जगभरात कोरोनाने थैमान घातले असुन हे थैमान रोखणे आपली जबाबदारी आहे. यासाठी शासन आणि आरोग्य यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सुचनांचे तंतोतंत पालन करा. असे आवाहन संजय गरूड यांनी केले आहे. त्यांनी नुकतीच कोरोनावर मात केली.