भाजप वैद्यकीय आघाडी ( ग्रामीण ) ची जिल्हा कार्यकारणी जाहीर

349

लोहारा ( दिनेश चौधरी ) – प्रा . डॉ . विजय शास्त्री ह्यांची फार्मसी शाखेच्या सहसंयोजक पदी तर डॉ . प्रशांत भोंडे व डॉ . कुंदन फेगडे ह्यांची विशेष आमंत्रित सदस्यपदी नियुक्ती !
भारतीय जनता पार्टी , जळगाव जिल्हा ग्रामीण च्या वैद्यकीय आघाडी ( चिकित्सा प्रकोष्ठ )
ची नूतन कार्यकारणी ,मुख्य संयोजक डॉ . नरेंद्र ठाकूर , नगरसेवक एरंडोल ह्यांनी जळगाव जिल्हाध्यक्ष आमदार माननीय राजूमामा भोळे व सरचिटणीस सचिनभाऊ पानपाटील व भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ . नितु पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाने नुकतीच जाहीर केली .
महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी चे मुख्य संयोजक डॉ . अजितजी गोपछडे ह्यांच्या नेतृत्वाखाली नव्याने आकार घेत असलेल्या ह्या आघाडीत आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या एलोपॅथी , आर्युवेदिक , होमिओपॅथी , दंतचिकित्सा ह्या शाखेतील डॉक्टरांबरोबरच फार्मसी ( ओषधनिर्माणशास्त्र ) , रेडिओग्राफर , फिजिओथेरपिस्ट व इतर निमवैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश केला जात आहे .
नव्यानेच नियुक्त झालेल्या जिल्हा वैद्यकीय आघाडी च्या कार्यकारणीत एरंडोल येथील शास्त्री इन्सिट्यूट ऑफ फार्मसी ह्या कॉलेजचे संस्थापक डॉ . प्रा . विजय शास्त्री ह्यांची जळगाव जिल्हा भाजप वैद्यकीय आघाडी च्या जिल्हा सहसंयोजक ( फार्मसी ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे .जामनेर येथील डॉ . प्रशांत भोंडे ( गटनेता नपा जामनेर ) आणि डॉ . कुंदन फेगडे ( नगरसेवक यावल ) ह्यांची विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .
जिल्हा प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ . केयूर चोधरी , लोहारा ( पाचोरा ) ह्यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर जिल्हा सहसंयोजक खालीलप्रमाणे आहेत –
डॉ . संजीव पाटील ( जामनेर ) , डॉ .सुनील पाटील ( साकळी , यावल ), डॉ . जीवन पाटील ( पाचोरा ),डॉ . शैलेश सूर्यवंशी ( धरणगाव ) , डॉ . मनोज विसपुते ( जामनेर ) , डॉ मनोहर भामरे ( चाळीसगाव ) , डॉ . महेश वाणी ( चाळीसगाव ) , डॉ सनी जैन ( भुसावळ ) डॉ . शिवाजी उभाळे , (पाचोरा ), डॉ .पंकज चौधरी ( चुंचाळे चोपडा )डॉ पराग पाटील ( दंतचिकित्सा , यावल ) , डॉ नरेंद्र अग्रवाल ( दंतचिकित्सा ,चोपडा , )
श्री . सुरेंद्र सोंनोने ( रेडिओग्राफर निमवैद्यकीय , भुसावळ ) !

नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व जिल्हा सहसंयोजकांचे माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा प्रभारी ,राज्य भाजप वैद्यकीय आघाडी आ . गिरीशभाऊ महाजन , राज्य जनजातीय क्षेत्र संपर्क प्रमुख किशोरजी काळकर , उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवीजी अनासपुरे , राज्य भाजप उपाध्यक्ष स्मिताताई वाघ , भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे , खासदार रक्षाताई खडसे , खासदार उन्मेषदादा पाटील , आमदार चंदुभाई पटेल , जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील , उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ प्रशांत पाटील , उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ नितु पाटील ह्यांनी अभिनंदन करून आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत .