डॉ सागर गरुड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल सव्वाशे रक्तदात्यांनी केले रक्तदान

220

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सागर गरुड यांच्या वाढदिवसाला तब्बल सव्वाशे तरुणांनी रक्त दान देत आपली सामाजिक जबाबदारी निभावली.
डॉ गरुड यांच्या वाढदिवसा निमित्त शेंदुर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .माहेश्वरी मंगल कार्यालयात आयोजित शिबिराला तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला .त्यात डॉक्टर ,पत्रकार ,वकील यांचे सह तालुका भरातून आलेले शेतकरी कार्यकर्ते यांनी रक्त दान केले. कोरोनाचे नियम पाळीत होत असलेल्या शिबिरात सॅनिटायझर व मास्क चे वितरण करण्यात आले .तसेच तालुक्यात व कोवाड सेंटरला विविध ठिकाणी मास्क सॅनिटायझर अन्य धान्याचे वितरण सागर गरुड यांच्या हस्ते त्यांच्या मित्रमंडळी च्या वतीने करण्यात आले .या वेळी डा. गरुड यांच्या सत्कार करण्यात आला .सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले .अशाच प्रकारे तरुणांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवावे .कोरुना लढाई आपण यशस्वी पार पाडू अशा विश्वासही त्यांनी या वेळी दिला.
या वेळी जामनेर तालुक्यातील विविध गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन सागर गरुड मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.