लोहारा येथे डॉक्टर सागर दादा गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताने मास्क वाटप

380

माणुसकी समूह व सुलक्ष्मी सेवाभावी संस्था यांचा स्तुत्य उपक्रम
दिनेश चौधरी , लोहारा तालुका पाचोरा.
येथे माणुसकी ग्रुप सामाजिक उपक्रम राबवून गावातील तरुणांचे वाढदिवस साजरे करीत असतात. कधी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, वक्षारोपण. आता मात्र त्यात नवीन सामाजिक उपक्रम म्हणजे कोरोनाचा उद्रेक पाहून मास्क वाटप करून वाढदिवस साजरा केला गेला.आज विघ्नहर्ता मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे संचालक व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे सभासद डॉक्टर सागर दादा गरुड यांचा वाढदिवस मास्क वाटप करून साजरा करण्यात आला. जामनेर पाचोरा तालुका डॉक्टर सागर दादा गरुड यांचे कार्य पाहत आहे.. गोरगरिबांसाठी अर्ध्या रात्री धावून येणारा व्यक्तिमत्व, रुग्ण सेवेमध्ये तत्पर असलेले व्यक्तिमत्व, सामाजिक बांधिलकी जपून सर्वसामान्यांना मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व, तरुणांना योग्य सल्ला देऊन छोटे छोटे उद्योग धंदे व्यवसाय चालू करून देणारे व्यक्तिमत्त्व..फक्त डॉक्टर सागर दादा गरुड परिचित आहेत. लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मास्क वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवेंद्र पाटील,माणुसकी रुग्णसेवा समूह जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, डॉक्टर विकास पालीवाल, कैलास देशमुख माणुसकी ग्रुप सदस्य हजर होते.