मेणगाव ग्रामपंचायतीला जामनेर गट विकास अधिकारी सौ. कवडदेवी मॅडम यांनी वृक्षलागवड निमित्ताने इतर कामांचा आढावा घेतला आणि गावातील गुणवंत विद्यार्थीचा सत्कार केला

426

          शेख हमीद शेंदुर्नी ता.जामनेर.

शेंदुर्णी पंचक्रोशीत आदर्श गांव असलेले मेणगाव येथे आज पंचायत समिती जामनेर येथील गट विकास अधिकारी सौ. ज्योती कवडदेवी मॅडम हे वृक्षलागवड निमित्ताने व इतर कामांचा आढावा घेण्यासठी आल्या असता त्यांचा ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रा.पं. सदस्या सौ. मनीषा ढमाले यांनी शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देवून सत्कार व स्वागत केले. तसेच सोबत आलेले पंचायत समितीचे म.गां.रो.हमी.योजनेचे व. लिपिक श्री. वसंत बारी यांचे स्वागत उपसरपंच गणेश पाटील यांनी केले यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामध्ये कुमारी शिवानी गजानन धुमाळ व कुमार यश वसंत बारी तसेच कुमारी कृषानाली विलास पाटील यांचा सत्कार मा. गट विकास अधिकारी सौ. कवडदेवी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असतांना सांगितले कि अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम केला असता त्यांना या माध्यमातून त्याच्या कलागुणांना वाव मिळतो व प्रेरणा मिळते आणि त्यांची उत्तम पायाभरणी होते.
या वेळी गावाचे सरपंच श्री. शरीफ तडवी, उपसरपंच श्री गणेश पाटील ( सिंगर पी. गणेश ) ग्रामसेवक श्री. जि. एन. काळे ग्रा. पं. सदस्य जगदीश धुमाळ, श्री. दिपक पाटील ग्रा. पं. सदस्या सौ. शितल पाटील, सौ.सुनिता पाटील, श्रीमती सिंधुबाई मेढे, सौ. मनीषा पाटील गावातील जेष्ठ व माजी सरपंच श्री. सुरेश नारायण पाटील व श्री विलास पाटील, सुनील मेढे, शे. शफिक, लक्ष्मण मोहणे सर, अनिल बोरसे, श्री. अशोक पाटील श्री. भास्कर पाटील, श्री. चंद्रशेखर कोळी, अंगणवाडी सेविका, व मदतनीस ग्रा.पं. कर्मचारी श्री. किशोर रोझे, भास्कर कोळी, ज्ञानेश्वर साबळे, गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.