तरंगवाडी रस्त्यावर पुलकाम बंधाऱ्याचे लोकार्पण

239

 शेंदूर्णी ता.जामनेर प्रतिनिधी – येथून जवळच असलेल्या शेंदूर्णी तरंगवाडी रस्त्यावरील नाल्यावर जिल्हा नियोजन समिती , जळगांव व जिल्हा परिषद जळगांव लघुसिंचन विभागाचे जामनेर उपविभाग मार्फत पूल कम बंधारा बांधण्यात आला आहे. तरंगवाडी पूल कम बंधाऱ्याचे लोकार्पण मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गरूड ,मा.जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी संजय गरूड ,ऍड विजय काबरा, गजानन बारी यांचे हस्ते दिनांक ४/२/२०२३ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले.लगेच पूल सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यात आला आहे.यावेळी बोलतांना संजय गरूड यांनी सांगितले की पावसाळ्यात नाल्याला नेहमी मोठा पूर येत असल्याने शेतकऱ्यांना या भागातील शेतकऱ्यांना पूर ओसरे पर्यंत रात्री उशिरा ३/४ तासाने शेतातून घरी यावे लागत होते तसेच बैल गाडीचे बैलांना नाला उतरून चढायला खूप कष्ठ घ्यावे लागत होते पावसाळ्यात मुक्या प्राण्यांचे होणारे हाल व शेतकऱ्यांची होणारी फजिती पाहून मन हेलावून जायचे ,जिल्हा परिषद सदस्यांना वार्षिक अत्यल्प निधी उपलब्ध होतो परिसरातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी मांडलेल्या व्यथांची दखल घेऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पुलाचा विषय त्याच बरोबर सिंचन सुविधा उपलब्ध करून कायमचा मार्गी लागला असून यापुढे शेंदूर्णी तरंगवाडी रस्त्यावर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि मुक्या जनावरांनाही त्रासाला सामोरे लागणार नाही याबद्दल पूल कम बंधाऱ्याचे लोकार्पण करतांना विशेष आनंद होत आहे. या वेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आभार मानले.तसेच रस्त्याच्या मुरुमीकरण व डांबरीकरणसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या वेळी परिसरातील शेतकरी प्रभाकर पाटील, कैलास काबरा, निलेश बारी,अतुल बारी,अक्षय बडगुजर ,कैलास पाटील,सुभाष बारी, स्नेहदीप गरूड ,कडोबा बडगुजर, प्रकाश पाटील,भगवान बडगुजर, कैलास परदेशी,अक्षय पाटील यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.