शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रातील राजश्री पाटील याआरोग्य सहाय्यीके ला राष्ट्रपतीच्या हातून मिळणार पुरस्कार

259

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायीका राजश्री तुलसीराम पाटील यांना आदर्श परिचारिका पुरस्कार राष्ट्रपती च्या हस्ते मिळणार असल्याचे पत्र प्राप्त होताच आरोग्य केंद्रात एकच जल्लोष झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात राजश्री पाटील या आरोग्य सहायीका या पदावर परिचारिकेचे काम करतात .त्यांना नुकतेच स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या नर्सिंग कौन्सिल विभाग यांचे पत्र प्राप्त झाले. तसेच पत्र आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांनाही त्यांनी पाठवले. त्यात त्यांनी सांगितले आहे की राजश्री पाटील, शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र यांची निवड पुरस्कारा करता झाली आहे. सदर पुरस्कार या महान परिचारिका फ्लोरेंस नाइटिंगेल यांच्या नावाने दर वर्षी भारतातील मोजक्याच परिचारिकांना देण्यात येतो. राष्ट्रपती कार्यालयातून पुरस्कारासाठी वेळ उपलब्ध झाल्यावर पुढील माहिती व तारीख कळविण्यात येणार आहे.
इयत्ता बारावी शिक्षण पात्रतेच्या नोकरीवर लागलेल्या राजश्री चे माहेर जामनेर तालुक्यातील पहूर असून सासर भिलखेडा ता.जामनेर येथील आहे .पती शेतकरी असून एक मुलगी आहे. आरोग्यसेवेत १९९८ साली लोहटार तालुका पाचोरा येथून आरोग्य सेवेला सुरुवात करताना २०१२ साली शेंदुर्णी येथे बदली झाली. येथे त्यांना आपल्या कार्य सेवेची चुणूक दाखवायची संधी मिळाली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डा. अतुल सोनार,डा. राहुल निकम, डा.पंकज जाधव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेवेला त्यांनी मातृत्वाचा ओलावा दिला .त्यांच्या कार्यकाळात शेंदुर्णी आरोग्य केंद्राला तिन वेळेस आनंदीबाई जोशी मानाचा महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कार ,कायाकल्प राज्य शासनाचा पुरस्कार दोन वेळा तसेच आय.एस.ओ. दर्जा प्रदान करण्यात आला. प्रसूतीमध्ये जिल्ह्यात शेंदुर्णी आरोग्य केंद्र दर वर्षी पहिल्या दोन मध्ये येते यात राजश्री पाटील यांचा महत्त्वाचा वाटा आहे. राजश्री पाटील यांचा प्रसूती करण्या संबधी जिल्ह्यात ५ वेळा प्रथम,कुटुंब कल्याण योजना राबविण्यात जिल्ह्यात ५ वेळा प्रथम,कापर टी चे उद्दिष्ट मधे सलग तिन वेळा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. जिल्हापरिषद यानी सुद्धा आतापर्यंत क्लोरिन माइट्गल आदर्श परिचारिका पुरस्कार तीन वेळा देउन कार्याची पावती दिली. अगदी कोरूना काळातही राजश्री पाटील यांनी प्रसूति, कुटुंब कल्याण व लसीकरण यांचे उद्दिष्ट पेक्षा जास्त काम करून आरोग्य केंद्राची मान उंचावली.चालू वर्षेत २२० प्रसूती केल्याची नोंद त्यांचे नावावर आहे. रुग्णांना चोवीस तास उपलब्ध होता यावे म्हणून त्या नेहमीच मुख्यालयात राहतात.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गरुड, जिल्हा परिषद सदस्य सरोजिनी गरुड, नगराध्यक्षा विजया खलसे उपनगराध्यक्षा निलेश थोरात गोविंद अग्रवाल, जिल्हा वेद्यकिय अधिकारी भीमाशंकर जमादार ,तालुका वेद्यकिय अधिकारी डा.राजेश सोनवणे,नाना माळी,आदींनी अभिनंदन केले आहे.