निधन वार्ता : लोहारा येथील व्यापारी कै.शांतीलाल जैन यांचे दुःखद निधन

364

लोहारा (दिनेश चौधरी )– लोहारा येथील जैन समाजाचे कार्यकर्ते , प्रतिष्टीत व्यापारी कै.शांतीलाल रामलाल जैन (वय-७५ )यांचे आज ३० सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुखद निधन झाले.त्यांच्या पश्चात ३ मुले,१ मुलगी ,सुना नातवंडे असा परिवार आहे.ते तु.आ.माळी पतसंस्थेचे माजी व्हाईस चेअरमन विजय शांतीलाल जैन व राजेंद्र आणि मनोज जैन यांचे वडील होत.

त्यांची अंत्ययात्रा उद्या १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.