लोहारा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न ,माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

234

लोहारा (दिनेश चौधरी )- येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न ,माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.हल्ली लोहारा ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने ग्रामपंचायतीचा  कारभार प्रशासक पाहत आहे. त्यामुळे  आज पत्रकार यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त पूजन करण्यात आले.

यावेळी येथील  पत्रकार व खान्देश न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक दिपक पवार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे हेड क्लार्क रविंद्र पाटील, नरेंद्र पालीवाल, पत्रकार दिलीप चौधरी,संगणक परिचालक प्रल्हाद चौधरी,सुभाष बाविस्कर, संतोष भिल,विकास देशमुख आदी उपस्थित होते.