जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या विरोधात शेंदुर्णीकर उतरणार रस्त्यावर , ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाची तयारी सुरु..!

338

महाकुंभ आटोपला आतातरी जामनेर सा.बा.विभाग शेंदुर्णी शहरातील मुख्य रस्त्याकडे लक्ष देणार की दुर्घटनेची वाट बघणार , 
शेंदुर्णी ता. जामनेर प्रतिनिधी – येथील स्टेट बँक ते सोयगाव रोडवरील पाण्याच्या टाकी पर्यंत रस्ता रुंदीकरण व सांडपाणी वाहून नेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गटारीचे बांधकाम जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांचे मार्फत गेले ४/५ वर्षांपासून कासवगतीने सुरू असून दीड दोन किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ४/५ वर्ष कालपव्यय करून जामनेर सार्वजनिक बांधकाम उपविभाग वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित करण्याचा तयारीत असतांना स्थानिक नागरिकांचे रोषाकडे दूर्लक्ष करीत आहे. या विरोधात येथील पोलिस आऊट पोस्टला नागरिकांनी निवेदन दिले असून बांधकाम विभागाचे वरील रस्त्याच्या कासवगती कार्याविरुद्ध ८ फेब्रुवारी रोजी रस्ता रोको करण्याचा इशारा स्थानिक रहिवासी नागरिकांनी दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शेंदुर्णी येथील स्टेट बँक ते मोहम्मदया अग्लो उर्दू शाळेपर्यंतचा सोयगाव रोडवरील रस्त्याचे काम तब्बल पाच वर्षापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर यांनी हाती घेतले आहे परंतु अद्यापही काम पूर्णत्वास नेले जात नसल्याने उडणारी धूळ , रस्त्यावर सोडलेले सांडपाणी तसेच कच्च्या रस्त्यावर रोजचे होणारे अपघात याला कंटाळून शेंदुर्णीतील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेंदुर्णीतून जाणारा अवघे २ किलो मीटरचा सोयगाव रस्त्याच्या संथगती कामाने नागरिक वैतागले आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाने गेले दोन वर्षांपूर्वी रस्ता खोदून ठेवलेला आहे. तसेच रस्त्यात जागो जागी मातीचे ढिगारे उभे केले आहेत तर काही ठिकाणी गड्डे खोदून ठेवलेले आहे. ज्यामुळे वाहतुकीला व दैनंदिन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. गेल्या वर्षभरापासून शेंदुर्णीत नुकताच भागवत कथा वाचन ७ दिवसीय धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी वृद्ध महिला व पुरुष भाविक भक्तांना या रस्त्याचे कामामुळे फार मोठया त्रासाला सामोरे जावे लागले. सदर रस्त्यांवर शाळा, मंदिर, मज्जिद, मंगल कार्यालय, निवासी घरे आहेत .या सर्व गोष्टींचा त्रास भाविकांना, वाहतूकदारांना, रुग्णांना, वयोवृद्ध लोकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना होतो याचे कुठलेच सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाला नाही याची खंत परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा बोलून दाखवली आहे.
सदर रस्त्याचे काम येत्या ७ फेब्रुवारी२०२३ पर्यंत पूर्ण न केल्यास बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता शेंदुर्णीकर रस्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यासंबंधीचे निवेदन मा. मुख्यमंत्री म.रा. मुंबई , सा. बा. मंत्री म.रा. मुंबई व  तहसीलदार जामनेर , उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग जामनेर , पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पहुर यांना दिले आहे.सदर निवेदनावर फरीद शेख ,शेख हमीद, वाहिद अली ,शकूर शेख, जुबेर शेख, नरेंद्र विसपुते, आदर्श बारी, रवी पाटील ,विक्रम बडगुजर, लक्ष्मण वाघ, रवींद्र गुजर, शेख खालीद, फिरोज खान. शेख अब्रार ,हन्नान खान, शेख शफीक ,शेख शाहरुख ,शेख निसार, साहिल शेख ,जुबेर शेख इफ्रान कुरेशी, शेख शरीफ, एकलाक कुरेशी, शकूर शेख, जुबेर शेख ,रईस शेख, आधी २०० नागरिकांच्या सह्या आहेत.