लोहारा येथील ऋषिबाबा मंदिर जाण्यासाठी रस्ता करून मिळण्याची मागणी

263

लोहारा ( दिनेश चौधरी ) लोहारा येथील जवळच असलेल्या ऋषिबाबा मंदिर ( रोटवद) हे अतिशय प्राचीन व जागृत मंदिर म्हणून लोहारा व परिसरात सुपरिचित आहे. ऋषीबाबा मंदिराजवळ जाण्यासाठी हा रस्ता अगदी जवळ पडतो, सध्या या मंदिराजवळ जायचे असल्यास लोहारा रोटवद हे 7 की.मी.अंतर आणि रोटवद येथून पुन्हा 4 की.मी. जावे लागते, सदर हा रस्ता दुरुस्त केल्यास भाविकांना फक्त पाच की.मी.अंतर आहे. तसेच या रस्त्याने लोहारा, कासमपुरा येथील शेतकऱ्यांनच्या जमिनी आहेत, पावसाळ्यात या रस्त्याने पायी चालणे खूपच अबघड होऊन जाते, सदर फोटो हे लोहारा येथून जाणाऱ्या श्री क्षेत्र ऋषीबाबा मंदिर येथे जाणाऱ्या रस्त्याचे आहेत ,गेल्या कित्येक वर्षांपासून सदर रस्त्याची सुधारणा व्हावी, म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केलेला आहे, मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधिनी या रस्त्याकडे लक्ष दिलेलं नाही,खूप दयनीय अवस्था झाली आहे. तरी लोहारा वरखेडी गटाचे जि. प. सदस्यपती श्री दीपक भाऊ राजपूत यांनी वेळीच लक्ष घालून रस्त्याचा कामाला मंजुरी मिळवून,त्वरित या रस्त्यच्या कामाला सुरुवात करावी,अशी शेतकऱ्यांसह भाविकांची मागणी आहे.