हिंदी भाषा आणि साहित्यात संपूर्ण विश्वाला जोडण्याची क्षमता – प्रो.सदानंद भोसले

214

 

शेंदुर्नी ता. जामनेर – दि. 17.09.2021 – शिक्षा, संस्कृति उत्थान न्यास, नवी दिल्ली, अ.र.भा. गरुड़ महाविद्यालय, शेंदुर्नी आणि दादासाहेब डी. एस. पाटील महाविद्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने आभासी मंचा द्वारे, 14 सप्टेंबर हिंदी दिवस तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभक्ती पर शौर्य कथा वाचन/ गीत/ कविता गायन राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन संपन्न झाले. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी स्वप्निल जाधव, कु. वर्षा देशमुख यांनी कविता तसेच प्राध्यापक डॉ. भूषण पाटील व डॉ. दिनेश पाटील यांनी शौर्य कथेचे वाचन केले. प्रमुख अतिथि प्रो.डॉ. सदानंद भोसले (हिंदी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले विद्यापीठ ,पुणे) यांनी सांगितले की, हिंदी भाषा आणि साहित्या च्या माध्यमातून आपण स्वतंत्र्याची लढाई जिंकली. वर्तमान काळात देखील विविध वैश्विक समस्या मानवतावादी विचारांच्या माध्यमातून या भाषा आणि साहित्याच्या आधारे आपण सोडवू शकतो.अध्यक्षीय समारोप करताना प्रो.डॉ. नरेंद्र मिश्र ( इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली) यांनी हिंदी साहित्याच्या योगदाना विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच आपले ग्रंथ वाचले व विपुल साहित्य संपदा जर नीट समजून घेतली तर आपणास योग्य मार्गदर्शन मिळेल व मार्ग सापडेल असे सांगितले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, प्रा.अप्पा महाजन यांनी शुभकामना संदेश दिला तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. रोहिदास गवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर वृंदांनी मेहनत घेतली.