माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र ट्रॉफी पुस्तक भेट देऊन सत्कार

185

प्रतिनिधी पहूर ता. जामनेर 

पहुर पोलीस स्टेशन हद्दीत स्त्री भ्रुण हत्या व भुताचा धाक दाखविन्याऱ्या तरुणांवर केली होती मोठी कारवाई

पहूर पोलीस स्टेशन येथे नुकतेच रुजू झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब व पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड यांनी नव्याने पदभार स्वीकारला आहे.पदभार स्वीकारताच त्यांनी पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत गावांमध्ये धडाडीची कामगिरी सुरू केली आहे.त्यामध्ये सर्वात मोठा गुन्हा लोंढरी तांडा येथे अनेक वर्षापासून प्रथा होती की तीसरी मुलगी जन्माला आली की ते दापंत्य त्या जन्मलेल्या मुलीला कायमचे संपवुन टाकायचे हि बाब पोलीस उपनिरिक्षक संजय बनसोड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्त्री भ्रुण हत्या करणाऱ्या दापत्यास स्त्रीभ्रूणहत्या केलेल्या बाळाचा पुरलेला मृत्यदेह बाहेर काढुन मोठि कारवाई केली आहे. व फत्तेपुर जळांद्री येथील काही तरुणांनी सोशल मीडियावर भुताचा धाक दाखविनारे व्हिडीओ व्हायरल केल्याने परीसरामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते पन त्यातील खर सत्य शोधत हे नक्कीच भुत आहेत की दुसरे कोन्हि भीतीचे वातावरण निर्माण करीत आहेत याचा शोध पोलीस निरिक्षक अरुण धनवडे व त्यांच्या टिम ने घेतला.ज्या ४ तरुनांनी हे कृत्य केले होते त्यांच्यावर मोठि कारवाई करत अटक केली होती.तसेच गावागावांमध्ये जाऊन शांतता समिती ची बैठक घेणे, अवैध दारू अड्ड्यावर धाड,सण उत्सव शांततेत साजरे कसे करावे त्याबद्दल मार्गदर्शन करणे,गुन्हे तपास लवकर करणे,यामुळे त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.या अगोदर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे साहेब यावल पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते.तर पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड साहेब छावणी पोलीस स्टेशन औरंगाबाद येथे कार्यरत होते.
पहुर पोलीस स्टेशन येथे माणुसकी रुग्ण सेवा समूहातर्फे शाल,श्रीफळ, सन्मानपत्र ट्रॉफी व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले. मनोरुग्ण व आरोग्य सेवा, पर्यावरण, रक्तदान शिबिरे घेणे, अशी ३२ सेवेचे कार्य सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चालु असलेले समाजोपयोगी कार्य माणुसकी समूहाच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात सुरु आहे. तुम्ही हे जे निस्वार्थी सेवा करत आहात ते खरंच कोणी करत नाही व अशी कामे करणारी माणसे समाजात खुप कमी असतात अशा शब्दात सरांनी कौतुक केले.माणुसकी समूहाचे कार्य सरांनी आवर्जून जाणून घेतले. व तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीत कुठेही बेवारस मनोरुग्ण निराधार व गरजवंत पेशंट असल्यास आम्हाला कळवा आमची माणुसकी समूहाची टीम मदतीसाठी सदैव उपस्थित राहिल.यावेळी सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे संस्थापक व माणुसकी रुग्णसेवा समूहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित, लोकमत पत्रकार मनोज जोशी, डॉक्टर जितेंद्र वानखेडे,
माणुसकी रुग्ण सेवा समूह जळगाव जिल्हाध्यक्ष समाजसेवक गजानन क्षीरसागर,
कवी मंगलदास मोरे,चेतन
पाटील,गोपाल वाणी,आदी माणुसकी समूहाचे सदस्य हजर होते.