लासगाव महावितरण २०१४ वर्षामधील तोडफोड प्रकरणातील ३५३ गुन्ह्यामधील सर्व शिवसैनिक व नागरीकांची निर्दोष सुटका – पाचोरा न्यायालयाचा निकाल

202

 

अॕड.दिपकदादा,पाटील,अॕड.पप्पुदादा काटकर,अॕड.राजुदादा परदेशी,अॕड.संदिप पाटील यांचे मिळाले अनमोल सहकार्य

पाचोरा प्रतिनिधी – लासगाव महावितरण कार्यालयात जाऊन नासधुस करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तब्बल ७ वर्ष पाचोरा कोर्टात खटला चालल्यानंतर आज दिनांक ८ आॕक्टोबर रोजी माननीय न्यायमुर्ती श्रीखंडे साहेब यांनी सर्व शिवसैनिक सह नागरीकांची निर्दोष सुटका केली.
हा खटला चालवण्यासाठी अॕड.दिपक पाटील,अॕड.पप्पुदादा काटकर,अॕड.राजु परदेशी,अॕड.संदिप पाटील यांनी आरोपीतर्फे सर्व कायदेशीर कामकाज ७ वर्षे बघीतले आणि त्यांच्या प्रयत्नांना आज यश मिळाले.सर्वांची निर्दोष सुटका झाली.७ वर्षापुर्वी महावितरण कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे कुरंगी-बांबरूड परीसरातील शेतकरीं व नागरीक संतप्त झाले होते.वेळोवेळी खंडीत होणारा वीजपुरवठा विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख किशोरआप्पा पाटील यांनी महावितरण कार्यालयावर एल्गार आंदोलन पुकारले होते.त्यावेळी माजी सभापती रविंद्र पाटील,अजय जैस्वाल,सुभाष तावडे,विनोद तावडे,शरद तावडे(पाटील), सुनिल नारायण पाटील, राजु तायडे, गोपाल परदेशी, अण्णासाहेब जालम,मनोहर हरसिंग पाटील,प्रशांत पवार सह अन्य जण होते.आणि त्यांनी सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करून शासकीय कामात अडथळा आणला असा आरोप ठेवण्यात आला होता.पण त्या आरोपातुन सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे.