शिरसोली येथील दिवंगत प्राजक्ता बुंदेला न्याय मिळण्यासाठी संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर शासन व्हावे – मागणी

380

प्रतिनिधी मुंबई –   शेंदूर्णी येथील माहेर असलेल्या शिरसोली येथील दिवंगत प्राजक्ता बुंदेला न्याय मिळण्यासाठी संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय दादा गरुड, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी, माजी जि प सदस्य कैलास पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री ना दिलीप वळसे-पाटील यांना निवेदन दिले. त्यावर तात्काळ मंत्रीमहोदयांनी जळगाव येथे मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सो यांच्याशी मोबाइलवर बोलून कारवाईचे आदेश दिले.