अंतुर्ली येथील अविवाहित तरुणाचा विहिरीत तोल गेल्याने मृत्यू

192

पाचोरा( प्रतिनिधी जावीद शेख) विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला असता घडली घटना पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथील रहिवासी अरबाज खान अनिस खान (२२) हा अविवाहित तरुण सकाळी अंतर्ली शिवारातील शेतात कामास गेला असता विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला.पाणी काढतांना अचानक पाय घसरून तोल गेल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना १ रोजी दुपारी १२:४५ वाजेपूर्वी घडली. अरबाज खान यास,पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे रशीद युसूफ खान यांनी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. सदरील घटनेबाबत पाचोरा पोलिसात | ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ, अमित साळुंखे यांनी खबर दिल्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सूर्यकांत नाईक तपास करीत आहे.