कासोदा येथील बिर्ला चौकातील एटीएम फोडून नऊ लाख 55 रुपयाचा ऐवज लंपास. घटनास्थळी पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची भेट

142

 

जळगाव (प्रतिनिधी जावीद शेख)
कासोदा तालुका एरंडोल: येथे काल बुधवारी सकाळी 4.30वाजेच्या आत गजबजलेले बस स्टॅंड परिसरातील बिर्ला चौकातील युनियन बँकचे एटीएम गॅस कटरच्या साह्याने कापून अवघ्या काही मिनिटात अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये असलेले नऊ लाख 55 हजार रुपये पसार केले. सदर चोरी कामी चोरट्यांनी चार चाकी वॅग्नर गाडीचा वापर केल्याची आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे समजते. सदर चोरीची फिर्याद दिपक दौलत तिवारी वय 38 वर्ष,राहणार सत्यम पार्क परिसर दुध फेडरेशन जवळ जळगाव यांनी दाखल केली आहे तसेच सदर एटीएम चालकांनी एटीएम चे ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवणे गरजेचे असल्याचेही चर्चा गावात सुरू आहे तरी यापुढे एटीएम चालकांनी सुरक्षारक्षक नेमावा ही मागणी जोर धरत आहे.तसेच सीसीटीव्ही कॅमेरे मुख्य ठिकाणी लावणे गरजेचे आहे बिर्ला चौक सारख्या परिसरात तर सीसीटीव्ही लावणे अत्यंत गरजेचे असतानाही याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही तरी आतातरी मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे अशी मागणी जोर धरत आहे.तसेच या कामी जळगाव वरून जंजिर नावाचे श्वानपथक पाचारण करण्यात आले होते परंतु एटीएम केबिनमध्ये गॅसचा वास येत असल्यामुळे श्वान पथकाला पुढील मार्ग दाखवता आला नाही म्हणून श्वान पथकाचा मार्गही अपयशी ठरला. तसेच या ठिकाणी ठसे तज्ज्ञ ही येऊन गेलेत.सदर घटना स्थळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग, जळगाव स्थानिकगुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बकाले यांनी भेटी दिल्या. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण हटकर, नितेश पाटील, स्वप्नील पर्देशी, इम्रान खान शेरखान तपास करत आहे,