शेंदुर्णीत १८ जण तडीपार ,पोलीस अधीक्षक जळगाव यांचे आदेश

535

शेंदुर्णी ता. जामनेर – शेंदुर्णी शहरांमध्ये कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी जातीय सलोखा अबाधित राहावा व जाती धर्मामध्ये सलोख्याचे वातावरण राहून शांतता राहावी यासाठी १८ जणांना तडीपार केले आहे.पोलीस प्रशासनाच्या वतीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एकूण 18 लोकांना जामनेर, पाचोरा व सोयगाव या तालुक्यातून सहा महिन्यासाठी हद्दपार केल्याबाबत पोलीस अधीक्षक जळगाव यांचे आदेश प्राप्त झाले असून आजच अंमलबजावणी होणार आहे.