शेंदुर्णी नगरी भक्तीसरात डुंबली, लाखो भाविकांनी घेतले दर्शन, वरुणराजाचीही हजेरी

588

      शेंदुर्णी ता.जामनेर, अँड. देवेंद्र पारळकर
खान्देशचे प्रति पंढरपुर म्हणुन सुप्रसिद्ध असलेल्या व भगवान श्री.त्रिविक्रम महाराज यांच्या वास्तव्याने पुणीत झालेल्या शेंदुर्णीत आषाढी एकादशीला लाखो भाविकांनी दोन वर्षानंतर भगवंताचे नयनमनोहर रुप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यानिमित्ताने विविविध संस्था, पतसंस्था, नगरपंचायत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ,सामाजिक, राजकीय संस्था, संघटना, नगरसेवक यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी फराळ, चहा.दुध,केळी वाटप करण्यात आले.
सकाळी महापुजा व अभिषेक..
रात्री ११ वाजता आमदार गिरिशभाऊ महाजन जामनेरच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजयदादा गरुड जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सरोजिनीताई गरुड, पं.दिनदयालजी उपाध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे, डॉ. चेतन अग्रवाल सौ.डॉ. पुजा अग्रवाल, पवन सुर्यवंशी सौ.स्वप्ना सुर्यवंशी यांनी सपत्नीक तसेच संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत,डॉ. विकास बोरोले,पाचोरा पिपल्स बँकेचे संचालक पवन अग्रवाल,प्रमोद बोरोले यांनाही भगवान श्री.त्रिविक्रम महाराज यांची महापुजा व अभिषेक केला. यावेळी शिरिष देवकर, भुषण देवकर, विजय पाठक,अरुण जोशी, जयवंत पिसे,ज्ञानेश जोशी, अँड. देवेंद्र पारळकर, डॉ. निलेश राव या ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र घोषात ही महापुजा व अभिषेक करण्यात आला.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, उपनगराध्यक्ष निलेश थोरात मुख्याधिकारी साजिद पिंजारी, गटनेत्या सौ.रंजना धुमाळ, डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कौमुदी साने ह.भ.प।कडोबा माळी,पंडितराव जोहरे तसेच नगरसेवक,सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या नंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. अतिशय सुंदर नयनमनोहर भगवान श्री.त्रिविक्रम महाराजांची मुर्तीचे तेज आज अधिकच खुलुन दिसत होते.पिंताबर परिधान केलेले, दागदागिने घातलेल्या व सभोवताली सुंदर फुलांची.आरास यामुळे डोळ्यांचे पारणं फिटल्याचे समाधान भाविक उरी साठवत होते.
सकाळी तसेच दुपारी वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. यंदा भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. तब्बल एक दीड किलोमीटरवर भाविकांची दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या.जागोजागी फराळ, चहा,दुध,केळी वाटप करण्यात येत होते.पंचक्रोशीतील असंख्य पायी दिंड्या भजनात तल्लीन होत मंदिरात असंख्य भाविकांसह दाखल झाल्या .यंदा शेंदुर्णीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद ची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला होता यामुळे सामाजिक ऐक्य सलोखा निर्माण झाला. काही मुस्लिम संस्था, युवक यांनी भाविकांना फराळाचे वाटपही केले.
चोख बंदोबस्त..
आषाढी एकादशीला यंदा पहुरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी कल्पकतेने व्यवस्थित बँरिकेटिंग, विविविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त बाहेर पार्किंगची व्यवस्था, वेळोवेळी ध्वनीक्षेपणावरुन भाविकांना आवाहन करण्यात येत होते.पोउपनि संजय बनसोड, दिलीप पाटील, अमोल गर्जे या अधिकारी वर्गासोबतच बाहेरून आलेले अधिकारी, पहुर अन्य ठिकाणाहून आलेले पोलीस बांधव होमगार्ड यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.अभाविप च्या स्वयंसेवकांनी,तसेच पोलीस मित्र, काही युवक सुरक्षा रक्षक म्हणुन आपली सेवा केली.स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने धार्मिक बाबींची माहिती देणारा स्टाँल लावला होता.माधवबाबा भजनी मंडळ यांचीही दिंडी आली होती.नगरपंचायतीचे वतीने दिवसभर शहरातील साफसफाई करण्यात येत होती.
रात्री श्री. त्रिविक्रम मंदिरात संतश्रेष्ठ कडोजी महाराज संस्थानचे गादीवारस ह.भ.प.शांताराम महाराज भगत यांचे पारंपरिक कीर्तन झाले. माजी मंत्री व आता होऊ घातलेल्या मंंत्रिमंडळातील हेवीवेट मंत्री गिरिशभाऊ महाजन यांनी महाराष्ट्रात सगळ्यांना आपले वाटणारे सरकार आले असुन आता महाराष्ट्रात सगळे सुखी आनंदी राहतील अशी प्रार्थना भगवान श्री.त्रिविक्रमाच्या चरणी अभिषेक व महापुजा करतांना साकडं घातले.

१)दोन वर्षाच्या नंतर भगवंताचे दर्शन मिळाल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी.
२)मुस्लिम समाजाच्या निर्णयामुळे जातील धार्मिक सलोखा निर्माण होण्यास मदत झाली.
३)मंदिराच्या आवारात प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय सुविधा
४)मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाला अर्धांगवायुचा झटका आला. यावेळी कर्तव्यावर हजर असलेल्या पोउपनि. अमोल गर्जे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या भाविकाला आपल्या खांद्यावर उचलुन घेत जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. लाखो भाविकांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या रुपात देवदुतच बघितला.
५)तीन प्रहरात भगवान श्री.त्रिविक्रम महाराज यांचे दर्शन घेतले तर साक्षात पंढरपुरच्या विठ्ठलाचे ,पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे समाधान लाभते यामुळे रात्री पर्यंत शांततेत उत्साह भाविक दर्शन घेत होते.