लॉर्ड क्रिष्णा प्रि प्रायमरी स्कूलच्या चिमुकल्यांचा दिंडी सोहळा

239

प्रतिनिधी शेंदुर्णी ता. जामनेर –  श्री छत्रपती शिवाजी क्रिडा व सांस्कृतिक मंडळ संचलित लॉर्ड क्रिष्णा प्रि प्रायमरी स्कुल च्या चिमुकल्यांनी आषाढी एकादशी निमीत्त भव्य दिंडी काढुन ज्ञानोबा माऊली च्या गजरात पावली खेळत वारी चा आनंद लुटला संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल आबा पाटील, सचिव श्रीकृष्ण चौधरी सर, नगरसेविका रंजना ताई धुमाळ, संचालक दिनेश विसपुते,सुनिल गुजर, संचालिका सौ मुक्ताताई चौधरी , सचिनभाऊ जगताप,सन्माननीय शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पंकजभाऊ अग्रवाल , उपनगराध्यक्ष निलेशभाउ थोरात, सिंगर पी गणेशजी,श्रीपादभाऊ विसपुते,डॉ पंकज गुजर,विशाल शिंपी ,सर्व शिक्षिका व सन्माननीय पालक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षीका स्वाती बारी ,सौ योगिता लोखंडे, जयश्री माळी,मदतनिस अंजु सोनवणे,रोशन गुरव यांनी परीश्रम घेतले.