शेंदुर्णीत दहीहंडी मिरवणुकीचे मुस्लिम बांधवांकडून स्वागत व शुभेच्छा

393

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी – सार्वजनिक दहीहंडी उत्सव समिती शेंदुर्णी वर्ष ३८ च्या वतीने दुपारी एक वाजता पूजा होऊन पूर्ण शहरातून दहीहंडी उत्सवाची मिरवणूक निघाली .विविध चौकात लावलेल्या दहीहंडी फोडण्यात आल्या .
अत्यंत उत्साहात शांततेच्या वातावरणात कुठलाही अनुचित प्रकार न घडता रात्री नऊ वाजता मिरवणुकीची सांगता झाली. दरम्यान मोमिन मोहल्ला भागातून मिरवणूक जात असताना मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच मिरवणुकीतील पाच गोविंदांचे प्रातिनिधिक स्वरूपात हार घालून सत्कार केला. शेंदुर्णी येथील हिंदू मुस्लिम बांधव आपापल्या धर्माचे सण सर्व जण सोबत येऊन गुण्यागोविंदाने शांततेत साजरे करतात, अशी शेंदुर्णी ची वैभवशाली परंपरा यावेळी ही दोन्ही समाजातील कार्यकर्त्यांनी कायम ठेवली.
या वेळी बोलताना पहुर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी सांगितले की “सण-उत्सव हे सर्व जाती धर्मातील ,सर्व घटकांनी एकत्र येऊन साजरे करण्यास करतात बनविलेले आहे शेंदुर्णी येथील जातीय सलोखा चा हा उपक्रम भूषणावह आहे ”
या वेळी मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचा सत्कार जावा शेख, मनसुर पिंजारी ,सांडू टेलर ,आरिफ मजिद, आसिफ खलिफा व इतर जेष्ठ श्रेष्ठ मुस्लिम कार्यकर्त्यांनी केला.दहीहंडी समिती अध्यक्ष अजय भोइ यानी यावेळी आभार मानले.
या वेळी शेंदुर्णी पोलिस स्टेशनचे अधिकारी दिलीप पाटील, पोलीस हेड शशिकांत पाटील, पोलिस विरणारे दादा ,होमगार्ड मनोज गुजर व इतर उपस्थित होते.