शेंदुर्णी रेल्वे स्टेशन शाळेत गुणी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप

257

शेंदुर्णी तालुका जामनेर
( वार्ताहर ) शिक्षण प्रसारक मंडळ शेंदुर्णी संचलित खाजगी प्राथमिक शाळा रेल्वे स्टेशन शेंदुर्णी तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे, त्या अंतर्गत दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी नगरपंचायत शेंदुर्णी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील मुलांनी सहभाग घेतला व चांगला कार्यक्रम सादर केला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला जेवणाचा स्टील डबा व शै. साहित्याचे वाटप,आज दि.20/08/2022 रोजी मुख्याध्यापक श्री मोहन पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .श्रीमती विजया बारी यांनी सूत्रसंचालन तर आभार श्रीमती हेमलता पाटील यांनी मानले तर अलका बारी यांनी विशेष परिश्रम घेतले.