पाचोरा तालुक्यातील दीड वर्षापासून फरार आरोपीस पिंपळगाव पोलिसांनी केली जेरबंद

238

पाचोरा( प्रतिनिधी जावीद शेख) पिंपळगाव पोलिस स्टेशन येथील सन 2021 मधील गु. र.न.117/2021 भा. द. वि. 379 या गुन्ह्यातील आरोपी गोकुळ रामदास राखपसरे वय 31 राहणार चिंचपूर ता.पाचोरा सद्या मुक्काम मोहाडी तालुका धुळे याने पिंपळगाव येथून मोटार सायकल चोरी केली होती.सदर गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी फरार होता.सदर आरोपी याचा पोलिस नाईक गोकुळ सोनावणे व पोलिस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांनी मोहाडी, जि. धुळे येथून शोध घेऊन दिनांक 25/8/2022 रोजी त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.त्यास न्यायालयीन कोठडी येथे हजर केले असता सदर आरोपीस सब जेल जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे सदर कारवाही पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोकुळ सोनावणे, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग गोरबंजार यांनी केली या कारवाई नंतर सर्व दूर जनसामान्यातून पिंपळगाव पोलिसांचे कौतुक होत आहे.