आचार्य गरुड विद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

188

शेंदुर्णी–
आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी या विद्यालयाच्या भव्य पटांगणावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारतात साजरा होत असतो, त्याच प्रकारे गरुड विद्यालयात शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा झाला. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थान इयत्ता दहावीच्या वर्गातील कुमारी कल्याणी काळे या विद्यार्थिनीने स्वीकारले. तिने आजच्या दिवसासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून भूमिका पार पाडलेली होती. उपमुख्याध्यापक म्हणून कुमारी सुचिता सुनील परदेशी या विद्यार्थिनीने काम पाहिले. दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून आजच्या दिवसाचे काम पाडले . त्यांनी शिक्षकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने चांगले कार्य करणाऱ्या होतकरू शिक्षकांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कार देण्यात येतो तो या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार इयत्ता 5वी ते7वी विभागातील उपशिक्षक भगवान जगन्नाथ पाटील इयत्ता आठवी ते दहावीच्या विभागातील उपशिक्षक युवराज पाटील व कनिष्ठ लिपिक गोपाळराव गजाननराव सूर्यवंशी यांना देण्यात आला. तसेच गरुड कर्मचाऱ्यांची पतपेढी च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने गरुड विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा रुमाल देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस .पी. उदार, उपमुख्याध्यापक ए. बी. ठोके पर्यवेक्षक जे .एस .जुंबळे, आणि व्ही. व्ही. पाटील, सर्व शिक्षक बंधू भगिनी ,कर्मचारीआणि विद्यार्थी उपस्थित होते.