अंत्योदय योजनेमार्फत दिव्यांगांना धान्य मिळणेकामी पाचोरा पुरवठा निरीक्षक यांच्या कडून लोहारा येथे चौकशी

339

 

दिनेश चौधरी, लोहारा. (प्रतिनिधी)
शासनाच्या सन-२०१३ सुधारित अधिनियमानुसार दिव्यांग कुटुंबप्रमुख किंवा दिव्यांग बांधव-भगिनी जे असतील, त्यांच्या कुटुंबियांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करून स्वस्त धान्य दुकानामार्फत ३५ किलो धान्य दिले जावे. या योजनेची अंमलबजावणी अनेक ठिकाणी होताना दिसून येते, परंतु लोहारा येथील काही पात्र लाभार्थी असताना त्यांना प्राधान्य गणनेनुसार धान्याचे वितरण सुरू आहे .लाभ देण्याची कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून व्हायला हवी होती. या हक्कापासून अनेक लाभार्थी वंचित असल्यानेलोहारा येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेमार्फत तहसीलदार यांच्याकडे योजनेची अंमलबजावणी होऊन पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला जावा अशी मागणी केली होती. याबाबतची दखल संबंधित विभागाकडून घेण्यात आली असून आज दिनांक ८ सप्टेंबर वार गुरुवार रोजी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले यांकडून चौकशी करण्यात आली .चौकशी होऊन पात्र लाभार्थ्यांना काही महिन्यातच लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एकता बहुउद्देशीय अपंग संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर(नाना) राजपूत,उपाध्यक्ष सुरेश पाटील संचालक अनिल चौधरी,विकास भोई,अहमदखान भिकनखान, कांतीलाल राजपूत,बाळू जाधव, विठ्ठल धनगर यांनी पुरवठा निरीक्षक अभिजीत येवले व वितरक उज्वल पालीवाल, जितेंद्र पालीवाल यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी दिव्यांग बंधू भगिनी यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.