माहेरहून दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी विवाहितेचा छळ – पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

220

 

पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख
माहेरहून दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी सासरच्या मंडळींकडुन विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर त्रास असह्य झाल्याने विवाहितेने पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील पिंजार मोहल्ला, हुसेनी चौक येथील बिल्कीस बी. हिचा विवाह शाहरुख नासिर शेख (रा. क्रांती मोहल्ला, गल्ली नं. ६, घर क्रं. २२०, सुरत) याचेशी दि. २१ एप्रिल २०१९ रोजी पाचोरा येथे मोठ्या थाटा माटात संपन्न झाला‌. लग्नानंतर सहा महिन्यातच बिल्कीस बी. हिचा किरकोळ कारणावरून तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी शारिरीक व मानसिक छळ सुरू झाला होता. सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर बिल्कीस बी. शाहरुख शेख यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये शाहरुख नासिर शेख (पती), नासिर इसामोद्दीन शेख (सासरे), सलमा नासिर शेख (सासु), चंद नासिर शेख (दिर) व हिना मोसिन पठाण (नणंद) सर्व रा. सुरत या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल विकास खरे हे करीत आहे.