पोलीस निरीक्षक नजन पाटील सांभाळणार स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार

119

 पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमर बकाले यांच्या एका ऑडिओ क्लिप मुळे झालेल्या निलंबनामुळे रिक्त झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदी पाचोरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांची वर्णी लागली आहे. नजन पाटील यांच्याकडे जळगाव एलसीबीचा पदभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी नुकतेच काढले आहेत.पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक, किसन लक्ष्मण नजन, पाचोरा पोलीस ठाणे हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचा अतिरिक्त कार्यभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव या पदाचे नियमित नेमणुक आदेश होईपावेतो त्यांचा मुळ पाचोरा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी या पदाचे कामकाज सांभाळून आहेत.