बकाले वर कठोर कारवाई होणारच अजितदादा पवार

311

पाचोरा प्रतिनिधी जावीद शेख-  मराठा समाजा बद्द्ल अपशब्द वापरणार्या पोलीस निरीक्षक बकाले वर बडतर्फ ची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने विरोधी पक्षनेते ना. अजितदादा पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली पाचोरा दौर्‍यावर असलेले अजीतदादा पवार यांना एलसीबी पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजा बद्द्ल अपशब्द वापरणार्या बाबत निलंबित कारवाई नंतर चौकशी करून सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सकल मराठा समाज व मराठा क्रांतीमोर्चा सह अखिल भारतीय मराठा समाज च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी ना. अजितदादा पवार यांनी कठोर कारवाई केली जाईल याचे आश्वासन मराठा क्रांतीमोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी, अ. भा. मराठा समाज अध्यक्ष डॉ योगेश पाटील, यांना दिले. यावेळी एक मराठा लाख मराठा.. बकाले बडतर्फ झालेच पाहिजे.. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी कॉलेज चौक दणाणला.. यावेळी संजय पाटील, राकेश सोनवणे, नितीन पाटील,गणेश पाटील, लकी पाटील, सचिन पाटील, राहुल शिंदे, दिगंबर पाटील, किशोर पाटील,कल्पशे येवले, आदी उपस्थित होते.