पो नि बकाले यांना निलबीत करण्याची शेंदुर्णी मराठा समाजाची मागणी

164

शेंदुर्णी(प्रतिनिधी) – मराठा समाजा बद्द्ल अपशब्द वापरणार्या पोलीस निरीक्षक बकाले वर बडतर्फ ची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक पहुर यांना निवेदन देऊन करण्यात आले.

एलसीबी पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजा बद्द्ल अपशब्द वापरणार्या बाबत निलंबित कारवाई नंतर चौकशी करून सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सकल मराठा समाज व मराठा क्रांतीमोर्चा सह च्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी शेंदुर्णी ओ पी चे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील यांनी आपली मागणी वरीष्टांपर्यंत पोहचविण्यात येईल याचे आश्वासन मराठा क्रांतीमोर्चा चे राज्य समन्वयक दिग्विजय सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष निलेश थोरात , सामाजीक कार्यकर्ते स्नेहदीप गरुड , दिपक जाधव , विलास अहिरे , नगरसेवक गणेश पाटील , एकनाथ दवंगे , सुरेश बगळे , अतुल पाटील ,शंकर पाटील , यासह अनेक समाज बांधव उपस्थीत होते. यावेळी एक मराठा लाख मराठा.. बकाले बडतर्फ झालेच पाहिजे.. जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आले. आदी उपस्थित होते.