पाचोरा येथे अनेक महिलांसह नागरीकांनी केला शिवसेनेत प्रवेश

248

जावेद शेख पाचोरा –  पाचोरा शहर येथे अनेक महिलांसह नागरीकांनी केला शिवसेनेत प्रवेश ( शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख उर्मिला शेळके व शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांचे हस्ते प्रवेश समारंभ संपन्न )पाचोरा शिवसेनेचे व कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांचे विकासाचे पॅटर्न व नेतृत्व स्विकारत आज शहरातील अनेक महिलांनी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख उर्मिला शेळके व शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला.हा समारंभ आज दुपारी शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे संपन्न झाला. जया विशाल पवार,पिंकी चंदन पारोचे, संगिता दिपक घारू, सपना आकाश चव्हाण,शितल रणजीत चनाडे,शितल नितीन सारसर,आकाश अनिल चव्हाण,सागर दिलीप पारोचे यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला व यावेळी सुभाष अण्णा ,विशाल राजपुत,श्रीराम पाटील, नाना वाघ, विजय भोई उपस्थित होते.