पाचोरा शिवसेनेची जनसेवा : पुरवठा विभागाशी संबंधित जनतेचे विविध प्रश्न सोडविले

291

जावेद शेख पाचोरा – .पाचोरा तालुक्यातील पुरवठा विभागाशी संबंधित सर्वसामान्य जनतेचे विविध दैनंदिन प्रश्नांबाबत – तालुका पुरवठा अधिकारी आंधळेसाहेब यांच्याशी बैठकित चर्चा करून प्रश्न सोडविले – शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर
शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील आणि युवासेना जिल्हा संघटक पप्पुदादा राजपुत यांची उपस्थिती”पाचोरा आज तालुका पुरवठा विभागा अंतर्गत येणारे सर्व विषयांबाबत सविस्तर चर्चा करून त्या तातडीने सोडवण्याबाबत सुचना शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी केली.बैठकीत घेण्यात येणारे…प्रमुख विषय –
१) पंतप्रधान मोफत अन्नसुरक्षा योजनेत नवीन लाभार्थींचे नाव समाविष्ट करण्यात बाबत….
२) वंचीत जे समाज बांधव आहेत व आर्थिक दुर्बल घटक आहेत जे बाहेरगावाहुन आलेले आहेत पण त्यांचेकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत म्हणुन रेशनकार्ड नाही आणि. रेशनकार्ड नाही तर पंतप्रधान मोफत अन्नसुरक्षा यादीत नाव नाही असे वंचीत नागरीकांना सुध्दा अन्न उपल्बध करता येईल का ? यासाठी त्यांची पण यादी मागवुन न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी सुचना बैठकित मांडली.
३) नवीन रेशनकार्ड उपल्बध करून देणे.
४) रेशनकार्डात नाव कमी करणे – किंवा वाढीव नाव समाविष्ट यापुढे फक्त एका दिवसात करून देणे.
५) फाटलेले रेशनकार्ड बदलुन किंवा इतर दुरूस्ती तातडीने करून देणे.
६) मागील ३ महिन्यांत तालुक्यात वाटप करण्यात आलेले रेशन धान्यांची शिल्लक व वाटप माहिती घेण्यात आली असता तालुक्यातील सर्व नागरीकांपर्यंत पुरवठा विभागाच्या निगरानीखाली पारदर्शकपणे व सुरळीतपणे स्वस्त धान्य दुकानदार मार्फत अन्नधान्य पोहचवण्यात आले असल्याचे कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी आंधळेसाहेब यांनी बैठकीत दिली *यासंदर्भात सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील व युवासेना जिल्हा संघटक पप्पुदादा राजपुत उपस्थित होते. त्या अनुषंगाने पाचोरा शहरासह- तालुक्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की,
ज्या नागरीकांचे खरोखर वंचीत असुन पंतप्रधान मोफत अन्नसुरक्षा योजनेत नाव समाविष्ट नाही,ज्यांचे रेशनकार्ड नाही आणि ज्यांचे रेशनकार्ड असुन देखील फाटलेले,दुरूस्ती,नाव वाढविणे किंवा नाव कमी करायचे असतील अशा सर्वांनी आपले ओरीजनल जुने रेशनकार्ड व आधारकार्ड व त्यांचे झिराॅक्स प्रतीसह इतर सर्व आवश्यक कागदपत्रासह प्रकरण शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा येथे दिनांक ३ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर पर्यंत सकाळी १० ते दुपारी ५ वाजेच्या दरम्यान जमा करावे* यानंतर प्राप्त सर्व प्रकरणे दररोज पुरवठा विभागाकडे वर्ग करून त्या प्रकरणांची चौकशी करून जे लाभार्थी खरोखर लाभापासुन वंचीत असतील त्यांना न्याय मिळवुन देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांनी यावेळी पाचोरा राजकारण ग्रुप’ला दिली आहे.
यासंदर्भात कोणाची तक्रार किंवा शंका असेल तर त्यांनी शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांचा युवासेना जिल्हा संघटक पप्पुदादा राजपुत यानी असे नम्र आवाहन पाचोरा शिवसेना व युवासेनातर्फे यांनी केले आहे..