शेंदुर्णी गरुड महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचा अभ्यास दौरा यशस्वी

112

प्रतिनिधी शेंदुर्णी –

दि.28.09.2022, बुधवार आज रोजी गरुड़ महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांनी “गंगा” नर्सरी कळमसरा ता.पाचोरा येथे अभ्यास दौऱ्या निमित्ताने भेट दिली. या नाविन्यपूर्ण उपक्रमात गंगा नर्सरीचे संचालक श्री.दत्तात्रय तावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व रासेयो स्वयंसेवकांना आपले अनुभव व ज्ञान कथन केले.त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीची शास्त्रोक्त माहिती देऊन झाडांची निगा कशी योग्य पद्धतीने राखता येईल याचे सखोल मार्गदर्शन केले.तसेच आपल्या संस्कृतीत निसर्गाचे स्थान अढळ असल्याचे प्रतिपादन केले.त्यांनी
या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना विविध भारतीय प्रजातीचे देशी वृक्ष,वेली व औषधी वनस्पतींची ओळख करून देत महत्व पटवून दिले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी.चे समन्वयक व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.दिनेश प्रकाश पाटील उपस्थित होते.त्यांनी सुद्धा उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत नोबेल पुरस्कार प्राप्त ‘ग्रीन बेल्ट’ चळवळीच्या प्रणेत्या वांगारी मथाई यांचे उदाहरण देऊन निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड किती गरजेची आहे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या “ग्रीन क्लब”ची स्थापना करून उपस्थित विद्यार्थ्यांना वृक्षांच्या संवर्धनाची व रोपणाची शपथ देण्यात आली.तसेच उपस्थित विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला.
या अभ्यास दौऱ्यात इंग्रजी विभागातील विद्यार्थी पवन, अर्जुन,योगिता,सपना,पल्लवी,अश्विनी,नम्रता,पवन,अनिल व इतरांनी सहभाग नोंदविला.या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवक महेंद्र घोंगडे,प्रतीक बोरसे व निलेश बारी यांनी परिश्रम घेतले.