राजकारण्यांच पुनर्वसन पत्रकारांच्या सहकार्यानेच होते -मंत्री अनिल पाटील पाचोऱ्यात मराठी पत्रकार संघाचे अधिवेशन संपन्न

88

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी )
पत्रकार हा कोणत्याही प्रकारची वेळ काळ न पाहता आपल्या कुटुंबाच्या सुख दुःखाची तमा न बाळगता विपरीत परिस्थितीत बातमीचे संकलन करुन समाजाला आरसा दाखविण्याचे काम करीत असतो, यामुळे समाजाने व राज्यकर्त्यांनी त्यांचविषयी आपुलकीची भावना ठेवली पाहिजे,राज्य कर्त्यांना कुणाला हिरो तर कुणाला झिरो करण्याचे काम ही पत्रकारच करतो,माझ्यावर अनेक वर्ष राजकीय गंडांतर होत असतांना माझे राजकीय पुनर्वसन पत्रकारांनी केले असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना अनिल पाटील यांनी मांडले ते पाचोरा येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा पाचोरा आयोजित अधिवेशनात बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वसंतराव मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर पाटील, राज्य सचिव विस्वासराव आरोटे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे,विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा अध्यक्ष शरद कुळकर्णी नगराज पाटील, पोलीस उपअधीक्षक धनंजय वेरुळे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे,योगेश गणगे, उद्योग प्रदीप पाटील, मनोज पाटील, बाजार समितीचे सभापती, गणेश पाटील, युवा नेते सुमित पाटील, किशोर बारावकर प्रविण ब्राम्हणे उपस्थित होते,

पाचोरा येथील भडगाव रोडवरील शक्ती धाम मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री ना अनिल पाटील यांनी सांगितले की समाजाला घडविण्याचे काम पत्रकार करीत असून एखादा विषय हाताळताना त्याला खूप अडचणी येत असतात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावे लागते यामुळे राज्य शासनाने त्यांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजेत, अनेक वर्षे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना पेंशन मिळण्यासाठी सरकारने अटी व नियम शिथिल केल्या पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, जालना येथील घटलेल्या प्रकारा बद्दल यांनी निषेध व्यक्त करत याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली, यावेळी आमदार किशोर पाटील यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले व अनेका दिलेल्या पुरस्काराचे मुळे त्यांच्या उभारी मिळणार असल्याचे सांगितले, तर आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडताना शासनाकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या प्रास्ताविक प्रविण सपकाळे सुत्रसंचलन महेश कोंडिण्य व शांताराम चौधरी तर आभार किशोर रायसाकडा यांनी मानले.

यांचा झाला गौरव 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे उपस्थित पत्रकारांना तीन लाख रुपये विम्याचे कवच, रेनकोट व छत्रींचे वाटप करण्यात आले,

यावेळी राज्य स्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विनायक दिवटे,व महेश कौडीण्य,उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक मनोज शांताराम पाटील, वैद्यकीय सेवा दुत डॉ मुकुंद सावनेरकर, उद्योग रत्न भोजराज पुन्सी,कृषी वैभव रत्न तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, आदर्श व्यवसायिक लक्ष्मण पुर्सणानी,किराणा व्यवसायातील विनोद ललवाणी, आदर्श सरपंच योगेश कौतीक पाटील,(शेवाळे) रेखाताई नंदू पाटील (वाडी)यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.