“घर घर इंधन ,हर घर सुरक्षा’ सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून शेंदुर्णीत घरोघरी गॅस साहित्य तपासणी मोहीम. राम सेवा इंडेन व इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम

251

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी –  शेंदुर्णी शहरात प्रत्येक घरामध्ये स्वयंपाका करिता गॅस वापरल्या जातो .त्याला लागणारी शेगडी ,नळी, रेग्युलेटर व टाकी याची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपासणी होणार असून ग्राहकांनी त्या सहकार्य करावे ,असे आवाहन रामसेवा गॅस इंडेन चे संचालक अजय राकेचा यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रत्येक घरात स्वयंपाक करता वापरला जाणारा इंधन म्हणजेच गॅस हा लिकेज होऊन कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते .आपण प्रत्येक वेळी फक्त गॅस टाकी बदलत असतो मात्र त्याचे रेग्युलेटर, नळी,शेगडी याची तपासणी करत नाही .त्यामुळे एखादी अनुचित दुर्घटना घडण्याचाही प्रसंग होऊ शकतो .नेमकी हीच बाब घेऊन इंडियन ऑइल व रामसेवा इडेन यांनी घरोघरी जाऊन गॅस नळी, रेग्युलेटर ,टाकी ,शेगडी व इतर साहित्य तपासणी करून सुरक्षित इंधन प्रणाली असल्याची खात्री करून घेणार आहे .त्याच बरोबर सर्व कुटुंबाचा 236 रुपयात इन्शुरन्स म्हणजेच विमा सुद्धा काढल्या जाणार आहे त्याचे जास्तीत जास्त मूल्य जवळपास 25 लाखापर्यंत आहे .इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड तर्फ तपासणी व्यवस्थापक श्री गोपाल गावंडे (वय 26) व त्यांचे सहकारी भैया सूर्यवंशी (वय 51) कृष्णा राजपूत (26) हे त्यांचे सोबत सदर कामकाज करणार आहे (ओळखपत्र पाहुनच घरात प्रवेश देणे) सुरक्षा नळी खराब असल्यास सरकारी शुल्क देऊन ते तात्काळ बदलण्यात येणार आहे .”हर घर इंधन हर घर सुरक्षा “योजनेचा शुभारंभ भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल व शेंदुर्णी नगरपंचायत च्या माजी उपनगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
सदर तपासणी साठी ग्राहक उत्सुक असून त्याबाबत दररोज कार्यालयास विचारणा होत आहे. योजनेचे कोतुक होत आहे.तरीसुद्धा कोणी ग्राहकांनी सदरची तपासणी करण्यासंबंधी असह मती दर्शवल्यास त्याचे पुढील डिलिव्हरी व इन्शुरन्स कंपनी नियमाप्रमाणे बंद होईल. त्यासाठी त्याला एक पत्र द्यावे लागेल तरी आपल्या कुटुंबाचा सुरक्षा चा विचार करून सदर योजनेत सहभाग नोंदवावा असे आवाहन रामसेवा इंडेन चे संचालक अजय राकेचा यांनी केले आहे.