गरुड विद्यालयात शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

174

शेंदुर्णी:- शेंदुर्णी ता.जामनेर द्वारा संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय. जवळपास दीड महिन्याच्या सुट्टीनंतर (१५ जून) शाळा सुरू झाली. नवीन वह्या पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले असून, शाळांनीही विद्यार्थ्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली. मागील वर्षीप्रमाणे यंदाही प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आला विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी उदार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं विद्यालयात स्वागत करण्यात आलं तसेच आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तक देण्यात आले. तसेच प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य एस.पी.उदार, उपमुख्याध्यापक शिंदे,पर्यवेक्षक जे.एस. जुंबळे विनोद पाटील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.