लोहारा येथील डॉ.पंडितविद्यालयात इस्रोची प्रतिकृती तयार करून आनंद उत्सव साजरा..

234

 

दिनेश चौधरी, लोहारा (प्रतिनिधी ) धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव सोसायटी द्वारा संचलित डॉ. जे .जी .पंडित माध्यमिक विद्यालय लोहारा येथे आज चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्रोची प्रतिकृती तयार करण्यात आली. यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी(ISRO) या शब्दाची प्रतिकृती तयार करून भारतीय चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला .
या मोहिमेबद्दल विद्यालयातील जेष्ठ शिक्षक व्ही एम शिरपुरे सर ,बी एन पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना या मोहिमेबद्दल माहिती दिली .तसेच विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक एस टी चिंचोले सर यांनी विद्यार्थ्यांना या मोहिमेचा उद्देश व भविष्यात होणारे फायदे या विषयी माहिती दिली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस टी चिंचोले व उपमुख्याध्यापिका सौ .यु. डी. शेळके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती तयार करण्यात आली .
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी ISRO सर्व शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन करण्यात आले.