पाचोरा तालुका बांबरुड येथुन उभ्या ट्रकचे टायर अज्ञात इसमाने लांबविली

196

 

पाचोरा प्रतिनीधी शेख जावीद
पाचोरा तालूक्यातील बांबरूड येथील दुकानासमोर उभ्या असलेल्या ट्रकचे ५० हजार रूपये किंमतीचे चार चाक अज्ञात चोरट्यांनी चक्क चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा शहरातील भडगाव रोड भागात राहणारे शशिकांत पाटील याचे बांबरूड येथे सुदर्शन सिमेंट प्रोडक्ट पेव्हर ब्लाॅकचे दुकानाच्या गेटजवळ त्यांचा चुलत भाऊ प्रमोद सोनवणे यांची १०१३ टरबो ट्रक क्रमांक एम. एच.०४ डी. एस. ०५५१ ही वाहन चालक महेश पटेल याने ३ नोहेंबर उभी केली होती. शशिकांत पाटील हे संध्याकाळी घरी जातांना गाडी व गाडीचे टायर होते. माञ राञी ८ वाजेच्या सुमारास तेथील कर्मचारी कृष्णा वसावा याचा फोन आला की ट्रकचे मागिल चार चाक कुण्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन घेऊन गेलेआहेत. दरम्यान शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट देउन परिसरात तपास केला पण टायर आढळुन आले नाहीत.घडलेल्या घटनेने व्यथीत होऊश शशिकांत पाटील यांनी ५० हजार रूपये किंमतीच्या चार टायर चोरीचा पाचोरा पोलिसात भा. द. वी. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास पोलिस नाईक अशोक हटकर हे करित आहेत.