शेंदुर्णीत ब्राह्मण संघर्ष यात्रेचे स्वागत

532

शेंदुर्णी ता.जामनेर, प्रतिनिधी
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी ब्राह्मण महाशिखर परिषद भारत आयोजित माहुर ते मुंबई येथे निघालेल्या ब्राह्मण संघर्ष यात्रेचे शेंदुर्णीत बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले.
बस स्थानक पासुन श्री.त्रिविक्रम मंदीराच्या पर्यंत भगवान परशुरामाच्या मुर्तीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेंदुर्णी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाठक होते.
यावेळी या संघर्ष यात्रेचे अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे,ब्राह्मण समाजावर होणारी जातीयवादी चिखलफेक थांबवली, ब्राह्मण शेतकऱ्यांना,विद्यार्थ्यांना अनुदान द्यावे,पुरोहित, पुजारी यांना दरमहा मानधन मिळाले तसेच श्री. भगवान परशुरामाच्या स्थळांना विशेष दर्जा द्यावा अशी मागणी या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने शासनाला करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी लक्ष्मीकांत दडके,अशोक वाघ,उदय मुळे,मोहन योगी,संतोष जोशी, नितीन बापट,विलास देशमुख ,डॉ. निलेश राव,गिरीश कुलकर्णी, अँड. सचिन देशपांडे तसेच मान्यवर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिरिष देवकर, रामप्रसाद शुक्ला, अरुण जोशी, गोपाल दायमा,सुनील साने,जयवंत पिसे, गिरीश कुलकर्णी, संजय उपाध्ये,अशोक बोरकर, ज्ञानेश जोशी, कन्हैया पांडे,गोविंद दायमा,मनोज बैरागी तसेच बहुभाषिक ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन अँड. देवेंद्र पारळकर तर आभार डॉ. देवानंद कुलकर्णी यांनी मानले.