प्रा. श्याम साळुंखे यांचा शोधनिबंध इंग्लंडच्या ब्रिटिश जर्नल मध्ये प्रकाशित

97

(संदर्भासाठी इंग्लंडच्या सहा प्रमुख ग्रंथलयात उपलब्ध)

शेंदुर्णी : अप्पासाहेब र भा गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. श्याम जीवन साळुंखे यांचा “अ स्टडी ऑफ ग्रोथ ऑफ ई-कॉमर्स बिझीनेस ऑफ इंडिया इन पोस्ट पँडेमिक इरा: एन ओव्हरव्हिव” हा शोध निबंध युरोपीयन सेंटर फॉर रिसर्च, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, लंडन, युके द्वारा प्रकाशित ब्रिटिश जर्नल ऑफ मल्टिडिसिप्लिनरी अँड ऍडव्हान्सड स्टडीज मध्ये नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.

प्रा. श्याम साळुंखे यांचा शोधनिबंध ह्या जर्नलच्या बिझीनेस अँड मॅनेजमेंट सायन्सेस या आवृत्तीत प्रसिद्ध करण्यात आला असून, तो संदर्भासाठी आणि अवलोकनार्थ इंग्लंड येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या दि बॉडलियन लायब्ररी, केम्ब्रिज विद्यापीठ लायब्ररी, ब्रिटिश लायब्ररी, नॅशनल लायब्ररी ऑफ स्कॉटलंड,
नॅशनल लायब्ररी ऑफ वेल्स, आणि डब्लीन येथील ट्रिनिटी कॉलेज लायब्ररी अशा एकूण सहा ग्रंथलयात उपलब्ध राहणार आहे.
प्रा. श्याम साळुंखे यांचा हा दुसरा शोधनिबंध असून यापूर्वी सण 2019 मध्ये रोकड विरहित व्यवहार समस्या आणि उपाययोजना याविषयावर आधारित शोध निबंध ऑक्सफर्ड विद्यापीठात संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादरीकरण आणि प्रसिद्ध करून वरील सर्व ग्रंथालयात संदर्भासाठी उपलब्ध आहे.

प्रा. साळुंखे यांच्या ह्या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन दादासाहेब श्री संजयजी गरुड, सचिव दाजीसाहेब श्री सतीशजी काशिद, सहसचिव भाऊसाहेब श्री दिपकजी गरुड, महिला संचालिका ताईसाहेब सौ. उज्वलाताई काशिद, सर्व संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.